तेर/ प्रतिनिधी

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील तेरणा हायस्कूलमध्ये दहावीच्या  परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.               

तेरणा हायस्कूल, तेर येथील इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेत98.40% गुण घेऊन सानिका राजाराम मांगले प्रथम ,94.60% गुण घेऊन भाग्यश्री तानाजी देवकते द्वितीय व 90.60%गुण घेऊन अपर्णा नंदू घोडके हिने तृतीय क्रमांक मिळविला आहे. तसेच 90.40 % गुण घेऊन वैष्णवी नवनाथ फंड  व 90 .00%गुण घेऊन दिव्या सुधाकर मळगे हिने  घवघवीत यश संपादन केलेले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा तेरणा टृष्टचे  संस्थेचे विश्वस्थ बाळासाहेब वाघ, जि .प. प्राथमिक शाळा स्पेशल तेरचे प्रभारी मुख्याध्यापक मारवाडकर  यांच्या हस्ते  सत्कार करण्यात आले. याप्रसंगी प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक अच्युत हाजगुडे, शारदा वाघ, बिभिशन देठे, सूर्यकांत जाधव , रमेश लकापते , शुभांगी पाटील ,नवनाथ पांचाळ ,मीनाक्षी बनसोडे, शरद सोनवणे व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते  

 
Top