तेर / प्रतिनिधी

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत काम करणाऱ्या 19 महिला स्वयंसहाय्यता गटांना सक्षम करून छोटे-छोटे उद्योग उभारणीसाठी भारतीय स्टेट बँक तेर शाखेने 47 लाख रुपये भांडवल वाटप केले आहे.

 महिला सक्षमीकरणाचा भाग म्हणुन ग्रामीण भागात महिला स्वयंसहाय्यता गटांची उभारणी मोट्या प्रमाणत करण्यात आली आहे. त्यांना उद्योग चालू करण्यासाठी वित्तीय सहाय्य हे बँके कडून करण्यात येत आहे.त्या नुसार 19 गटांना दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील भांडवल वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास सर्व गटांतील महिला उपस्थित होत्या.या मध्ये गटांना कर्ज वाटप प्रमाणपत्र भारतीय स्टेट बँक शाखा व्यवस्थापक अभिजित निकम यांच्या हस्ते देण्यात आले.या प्रसंगी ते उपस्थित महिलांना बोलतांना म्हणाले की, मिळालेले कर्जाचा उपयोग शाश्वत उपजीविका उभा करण्यासाठी करावा व यातून महिलांनी स्वत: स्वयंपूर्ण बनावे असे अवाहन केले. हे कर्ज मिळवुन देण्यासाठी तालुका स्तरावरून तालुका अभियान व्यवस्थापक पूजा घोगरे,तालुका व्यवस्थापक .नागेश काकडे,अभिजित पडवळ यांनी वेळो-वेळी मार्गदर्शन केले होते.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तेर प्रभाग समन्वयक राम अंकुलगे, बँक सखी कामधेनु देशमाने, प्रेरीका ज्योती नाईकवाडी, पुजा चौहान यांनी परीश्रम घेतले.

 
Top