उस्मानाबाद / प्रतिनिधी-
उस्मानाबाद जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशन यांची श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर येथे भरत जगताप यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण कार्यकारिणी बैठकीत जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे नूतन सचिव म्हणून योगेश थोरबोले,सहसचिव राजेंद्र सोलनकर व सदस्य सुशील बदोले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याला मा. अध्यक्ष भरत जगताप यांनी सूचित तर श्री संजय कोथळीकर यांनी अनुमोदन दिले.
या बैठकीस भरत जगताप,योगेश थोरबोले , राजेंद्र सोलनकर. रामजी सोळुंके,संजय कोथळीकर ,राजेश बिलकुले ,सचिन पाटील,सुरेंद्र वाले,उदय मोरे,सुनील बेळमकर,दयानंद कापसे,दिलीप चव्हाण, अंकुश गायकवाड,मल्लिनाथ गुंडूरे,इत्यादी उपस्थित होते.या निवडीबद्दल नूतन पदाधिकारी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे