उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद आंगणवाडीसाठी पुरविण्यात आलेल्या गॅस कनेक्शनचे बिल काढून देण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच स्विकारताना परंडा येथील बालविकास प्रकल्प अधिकारी यांना उस्मानाबाद लाच लुचपत प्रतिबंध विभागाने रविवार दि. १८ जुलै रोजी दुपारी जेरबंद केले. 

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रार गॅस एजन्सी धारक यांनी शासनाच्या योजनेद्वारे परंडा तालुक्यातील अंगणवाडी करिता ८६ गॅस कनेक्शन पुरविण्याचे काम केले होते. ८६ गॅस कनेक्शनचे प्रतिकनेक्शन ६ हजार ५६३ रुपये ५० पैसे, असे एकुण ५ लाख ६४ हजार ४६१ रुपयांचे बील काढून देण्याच्या मोबदल्यात प्रति कनेक्शन ५६३ रुपये ५० पैसे, असे ८६ कनेक्शनचे एकुण ४८ हजार ४६१ रुपयांची मागणी संबंधित अधिकाऱ्यांने केली होती. यानंतर तडजोडअंती ४० हजार रुपयांची लाच ठरली. सदर ४० हजार रुपयाची लाच स्विकारल्याने बालविकास प्रकल्प अधिकारी नारायण दशरथ गायके यांना लाचलुचत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेऊन परंडा पुलिस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला. ही कार्रवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधिक्षक राहुल खाडे, अप्पर पोलिस अधिक्षक मारुती पंडित, पोलिस उप अधिक्षक प्रशांत संपते, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गौरीशंकर पाबळे यांनी केली. याकामी त्यांना पोलिस अंमलदार मधुकर जाधव, विष्णु बेळे, विशाल डोके यांनी मदद केली. 

 
Top