वाशी / प्रतिनिधी
आज ग्रामीण रुग्णालय वाशी येथे आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले सर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वैद्यकीय अधिक्षक डॉ. कपिलदेव पाटील यांच्या नेतृत्वाखाली न्युमोकोकल काँन्जुगेट लसीकरण मोहिमेस सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. विजयकुमार सुळ यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपस्थित मातांना लसीकरणाविषयी मार्गदर्शन करुन एकुण 05 बालकांना लसीकरण करण्यात आले. या कार्यक्रमास डॉ. विनोद पवार ,डॉ. सोनाली गाढवे,अधिपरिचारिका श्रीमती रंजिता पाटील, वंदना लोंढे उपस्थित होते.तरी जास्तीत जास्त बालकांनी या लसीचा लाभ घ्यावा असे आवाहन सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. विजयकुमार सुळ यांनी केले आहे.