वाशी / प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी विद्यालय वाशी येथे दिनांक 12 जुलै 2019 पासून विद्यार्थी गृहाभेटीचा उपक्रम राबविण्यात येथे आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती गाढवे एस. व्ही. यांच्या कल्पकतेतून हा उपक्रम आयोजित करण्यात आला. सदरील उपक्रमात विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकविलेला अभ्यास तसेच सेतु अभ्यास तपासण्याची मोहीम विद्यालयातील शिक्षक व शिक्षिका यांनी पार पाडली.
छत्रपती शिवाजी विद्यालयात शिकत असलेल्या वाशी शहरातील तसेच आसपासच्या वस्ती व गावातील विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम तपासण्यात आला. यामध्ये कवडेवाडी, गोजवाडा, दळवेवाडी ,दसमेगाव, केळेवाडी , पारडी, जिन्नर, सारोळा, घोडकी इ गावात जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.यासाठी सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.