उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरूना काळात 1036 महिला विधवा झालेल्या आहेत .या महिलांच्या बाबतीत केंद्र सरकारने एक विशेष पॅकेज किंवा योजना जाहीर करावी असे निवेदन खा.सुप्रियाताई सुळे यांना राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी दिले आहे.
उस्मानाबाद जिल्हा हा मागास जिल्ह्यांच्या यादीत मोडतो. महाराष्ट्रामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे प्रमाण हे उस्मानाबाद जिल्हा दोन नंबरला आहे, असे असताना आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विधवा वेगळ्या आणि कोरोना काळात नव्याने तरुण महिलांचे वैधव्याची प्रमाण वाढले आहे .
अशा परिस्थितीमध्ये दैनंदिन आयुष्यामध्ये अशी लढत असताना हे एक दुर्दैवी संकट त्यांच्या आयुष्यात आलेली आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे, मुलांचे शिक्षण करणे आणि आयुष्यात गणित कठीण झाल्यामुळे या महिलांकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघणे तसेच या महिलांच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी आणि त्यांच्या उत्कर्षासाठी एक विशेष मोहीम राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो दोन्ही सरकारने राबवली गेली पाहिजे असे निवेदन खा..सुप्रियाताई सुळे यांना राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी दिले .