उस्मानाबाद/ प्रतिनिधी

सातत्याने होत असलेली डिझेलची दरवाढ तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी उस्मानाबाद जिल्हा मोटार मालक महासंघाच्यावतीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे दि.२८ जून रोजी केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, उस्मानाबाद जिल्हा मोटार मालक संघ ही मालवाहतूक धारकांची प्रतिनिधित्व करणारी संघटना असून ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस, नवी दिल्ली या देशव्यापी शिखर संघटनेची संलग्न आहे. कोरोना काळात डिझेलवरील कर रूपाने जमा होणारा महसूल उभारणी कामात निश्चित उपयुक्त ठरेल. मालवाहतूक व्यवसाय हा पूर्णपणे मागणी व पुरवठा या तत्वावर चालतो. परंतू २०१९ पासून व्यापार, उद्योग कमी अधिक प्रमाणात बंद आहेत. त्यामुळे व्यवसायातच ४० ते ५० टक्के झालेली घट आणि डिझेल दरात ३० टक्‍क्‍यांपर्यंत झालेली वाढ याचा ताळमेळ घालून व्यवसाय करणे अत्यंत अवघड झालेले आहे. तसेच व्यवसाय नसल्यामुळे प्रचंड प्रमाणात थकीत देणी वाहतूकदारांकडे थकीत असल्यामुळे अनेक वाहने फायनान्स कंपनीने ओढुन नेलेली आहेत. मोटार वाहन कायदा नियम ६७ (१) नुसार अपेक्षित Fixition of minimum frieght नसल्यामुळे माल वाहतूकदारांना आपले ट्रक चालविणे अशक्य झालेले आहे.  एआयएमटीसी या देशव्यापी सभासदांच्या झूमद्वारे झालेल्या बैठकीत सातत्याने सुरू असलेल्या डिझेल दरवाढीबाबत अत्यंत संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असल्यामुळे कोर कमिटीने देशभरातील माल वाहतूकदार दि.२८ जून रोजी एक दिवसाचा दंडावर काळ्या फिती बांधून दरवाढीचा निषेध नोंदविण्यात आला. तसेच यापुढे अशीच दरवाढ सुरू राहिली किंवा दरात योग्य घट न झाल्यास ऑगस्टमध्ये आपली वाहने आहे त्या ठिकाणी बेमुदत थांबविण्याचा निर्णय नाईलाजाने घ्यावा लागेल, असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे. 

यावेळी अध्यक्ष मैनोदीन पठाण, आयुब शेख, अल्ताफ सय्यद, हबीब शेख, सलीम पठाण, जमीर पठाण, सालेर पठाण, दीपक जाधव, सुनील शेळके, महेबुब शेख, वाहेद शेख, जावेद पठाण, करीम शेख, युनूस पठाण, जमाल तांबोळी, सचिन लोखंडे, किरण ढोणे आदीसह संघटनेचे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 

 
Top