उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

नगर परिषद उस्मानाबादची सर्वसाधारण सभा शुक्रवार दि. २३ जुलै रोजी नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या बैठकीत जिजाऊ चौक ते बोंबले हानुमान चौक रस्ता, कचरा उचलने गुत्तेदार, गल्लींचे नावे बदलने शाळेला नावे देणे आदी ३७ विषयांवर चर्चा झाली. यावेळी नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांनी शहरातील नगर परिषदेचे कोणतेही काम महाराष्ट्र सरकारच्या जीआर प्रमाणे व गाईडलाईन प्रमाणेच होईल, असे सांगितले.

शुक्रवारी दुपारी १ वाजता न.प.च्यासर्वसाधरण सभेस सुरुवात झाली.या सभेत विषय पत्रकेवर नसलेल्या जिजाऊ चौक ते बोंबली हनुमान चौक या रस्त्याच्या कामावरून वाद-विवादाला सुरुवात झाली.शिवसेनेचे गटनेते सोमनाथ गुरव यांनी तुमच्या आमदाराने या रस्त्याचे काम करू नका,अशी शासनाकडे मागणी केली आहे. यावर राणा पाटील यांचे समर्थक युवराज नळे यांनी ते लोकप्रतिनिधी आहेत,  लोकांच्या म्हणण्यानुसार रस्ता तयार करण्या मंजूर झालेल्या भ्ुयारी गटारीचे काम करावे, अशी मागणी केली होती.परंतु नंतर लोकांनी सध्या ६० ते ७० लाखाचे सिंमेट काँक्रेटच्या नाल्या तयार केल्या आहेत. त्यामुळे आता रस्त्याचे काम होऊ दया, अशी मागणी केली आहे. त्यामुळे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी रस्त्याचे काम करा, अशी मागणी केल्याचे सांगितले. शहरातील कचरा उचलणाऱ्या गंटागाडी गुत्तेदाराचे पैसे द्या, अशी मागणी एका नगरसेवकाने केल्यानंतर उदय निंबाळकर यांनी त्याला विरोध करत नििवदेमध्ये उचललेल्या कचऱ्याचा कंपोस्ट खत व गाढूळ खत निर्माण करने परंतु संबंधित गुत्तेदाराने कांहीच केले नाही, असे सांगून बील देण्यास विरोध केला. शहरातील जातीवर असलेल्या गल्लीचे नावे बदलून राष्ट्रीय पुरूषांचे नावे न.प.शाळेला व गल्लीला दयावी असा ठराव करण्यात आला. यावेळी न.प.चे मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे, उपनगराध्यक्ष अभय इंगळे, विविध पक्षाचे नगरसेवक  आदी  उपस्थित होते.


 
Top