उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या आणि जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्याच्या पुढाकाराने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर जिल्ह्यातील तृतीय पंथीयांना कोरोना प्रतिबंध लस देण्यास सुरुवात झाली आहे.

 महाराष्ट्र शासनाने तृतीयपंथीयांचे कल्याण हा विषय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे सोपविला आहे. त्यानुसार राज्यात तृतीयपंथीयांसाठी विविध योजना आणि उपक्रम राबविण्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे.

  या समितीच्या दि. 06 जुलै 2021 रोजी झालेल्या बैठकीमध्ये पुणे येथील समाज कल्याणचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या निर्देशानुसार उस्मानाबाद जिल्ह्यातील तृतीयपंथीय व्यक्तिंना प्राधान्याने कोविड-19 लस देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी जि.प.च्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिले होते. त्यानुसार आरोग्य विभागाकडून तृतीयपंथीयांना प्राधान्याने कोविड-19 लस देण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे.


 
Top