तुळजापूर / प्रतिनिधी-  

 श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हााधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी शुक्रवार दि.३० रोजी तिर्थक्षेञ तुळजापूरात येवुन  मंदीर महाद्वार व   मंकावती तिर्थकुड व परिसराची  पाहणी केली. यानंतर मुख्याधिकारी यांच्या कडुन सविस्तर माहीती घेतली.  नंतर ते उपजिल्हा रुग्णालय पाहणीसाठी रवाना झाले, सध्या वेळ कमी आहे पुन्हा लवकरच येवुन ऐतिहासिक पुरातन क्षेञाची पाहणी करणार असल्याचे यावेळी अधिकारी वर्गास सांगितले.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी आवले, तहसिलदार सौदागर तांदळे, मुख्याधिकारी अशिष लोकरे, पोलिस निरक्षक अदिनाथ काशीद, श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या प्रशासकीय अधिकारी तथा तहसिलदार योगिता कोल्हे, पीआरओ नागेश सांळुके सह मंदीर कर्मचारी नगरपरिषद अधिकारी उपस्थितीत होते

संबंधित अधिकारी वर्गांना दिल्या सूचना

श्री तुळजाभवानी मंदीरासमोर देवीदर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना सोशल डिस्टंस पाळण्यास तसेच मास्क घालण्यास भाग पाडा,  ऐकले नाही तर माञ योग्य ती कारवाई करा व मंदीर महाद्वार परिसरात वाहनांना प्रवेश बंद  करण्याच्या  सुचना जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगांवकर यांनी संबंधित प्रशासनास दिल्या आहेत. 

मंकावती कुंडाबाबत अहवाल मागविला

मंकावती कुंड हडप करण्याचे कारस्तान एका राजकीय पक्षाच्या नेत्याने केल्याची तक्रार कांही दिवसापुर्वी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली होती. या  तक्रारीच्या अनुशंगाने जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार न.प.चे मुख्याधिकारी व भुमिअभिलेखच्या उपाधीक्षकांची समिती नेमली आहे. यांचा अहवाल आल्यानंतर फौजदारी गुन्हे नोंद करण्याचे आदेश देणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.  


 
Top