उस्मानाबाद / प्रतिनिधी-

कोरोना संसर्ग हा दुर्धर आजारी व्यक्ती,वयोवृध्द व्यक्ती व गरोदर मातांना जास्त होऊ शंकतो.या पार्श्वभूमीवर गरोदर मातांना कोरोना लसीकरण करून घेणेबाबत शासनाच्या सूचना आहेत.त्यानुसार उस्मानाबाद जिल्हयात   आज ( 22 जुलै )मातृत्व संवर्धन दिन अभियानाच्या निमित्त फक्त गरोदर मातांच्या कोरोना लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. गरोदर मातांसाठी कोरोना लस अत्यंत सुरक्षित असल्याने त्यांनी ही लस घेऊन स्वत:ला संरक्षित  करावे , असे आवाहन जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता यांनी केले आहे.

  जिल्हयात आज एकूण 58 ठिकाणी केवळ गरोदर मातांसाठी आयोजित केलेल्या लसीकरणात  521 मातांचे लसीकरण करण्यात आले .तथापि , दि 9 जुलै 2021 रोजी प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान दिनी 700 गरोदर मातांचे लसीकरण करण्यात आले आहे .या लसीकरणासाठी वैद्यकीय अधीक्षक,तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी,सामुदायिक आरोग्य अधिकारी,आरोग्य कर्मचारी, आशा सेविका ,प्रयोगशाळा तंत्रज्ञ,समुपदेशक यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.

 कोविड लसीमुळे कोविड गंभीर स्वरुपाचा होत नाही,कमी दिवसाची प्रसुर्ती,नवजात बालकांचा मुत्यू होणे,प्रसुतीच्या वेळी गुंतागुंत होणे या बाबी सहजपणे टळू शंकतात म्हणून लस घेणे आवश्यक असल्याचेही श्री.गुप्ता यांनी म्हटले आहे.

 
Top