तुळजापूर / प्रतिनिधी-

तिर्थक्षेञ तुळजापूर   येथील लसीकरण मोहीम  जिल्हयात सर्वश्रेष्ठ  मोहीम ठरत असुन यासाठी   नगरपालिकेचा सिंहाचा वाटा असून  यात उपजिल्हारुग्णालय भुमिका महत्त्वाची  ठरत असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष  सचिन रोचकरी यांनी केले. ते प्रभाग क्र. १० येथे आयोजित स्मार्ट लसीकरण शिबीरात बोलत होते येथे शहरातील सर्वाधिक ३५१ जणांना लस देण्यात आली

यावेळी मुख्याधिकारी आशिष लोकरे,नगरसेवक अमर मगर, नगरसेविका अश्विनी रोचकरी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंचला बोडके, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीधर जाधव रुग्ण कल्याण समितीचे सदस्य आनंद कंदले विशाल रोचकरी सह नगरपरिषद उपजिल्हारुग्णालय  अधिकारी कर्मचारी उपस्थितीत होते.

याच कार्यक्रमामध्ये तुळजापूर शहरातील सेवानिवृत्त बँक कर्मचारी नंदकुमार कुतवळ बाळासाहेब अरविंद ठोंबरे संजय कांबळे राजेंद्र घाडगे डॉ. आनंद मुळे यांचा व उपजिल्हा रुग्णालयातील लसीकरण शिबिरात सहभागी सर्व कर्मचारी तसेच प्रभाग क्रमांक ४ मधील टीम या सर्वांचा सन्मान संयोजक विशाल रोचकरी यांच्या वतीने शाल ,फेटा, बुके व आई तुळजाभवानी ची प्रतिमा देऊन करण्यात आला.  सदरील शिबिरात विक्रमी ३५१ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी आशिष लोकरे, नगरसेवक अमर मगर,  यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.प्रास्तविक संयोजक विशाल रोचकरी यांनी केले 

शहरातील १९२२ नागरिकांचे लसीकरण नगर परिषद कार्यालयाच्या वतीने दिनांक १८ जून ते २६ जून या कालावधीमध्ये ९७१ जणांना तर १ जुलै ते १७ जुलै या कालावधीत ९५१ जणांना एकूण १९२२ नागरिकांना शिबिराच्या माध्यमातून लस देण्यात आल्या.

लसीकरण शिबिर यशस्वी करण्यासाठी  हिबारे नाना, नितीन जाधव, विशाल गंगणे,सादु कोळेकर, सोनू शिराळकर, सहदेव कोळेकर, कुमारी वरदायनी, रोचकरी कुमारी गार्गी कावरे तसेच उपजिल्हा रुग्णालय येथील जयप्रकाश हिरेपट ,मधुकर पवार ,पवन सागवे , पार्वती चव्हाण ,आलीशिबा अडसूळ, मुक्ताबाई माने, लक्ष्मीबाई काकडे, रेखा पडवळ, पठाण .एल .एम ,गालफाडे बालाजी, शिवकन्या कांदे ,अभंग सिस्टर यांनी परिश्रम घेतले.

 
Top