मुरूम/ प्रतिनिधी

तालुक्यात आगळा-वेगळा पुनर्विवाह पाहायला मिळाला. आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या लेकरांना या पुनर्विवाहाने मायेची सावली व वडिलांचे छत्र मिळाले तर एकमेकांना नवे जीवनसाथी मिळाले. मुळज येथील रविकांत विलास सोनकांबळे आणि दाबका येथील अयोध्या धनराज कांबळे या दोघांचा शनिवारी (दि १०) पुनर्विवाह घडून आला.

रविकांत यांचा विवाह काही वर्षांपूर्वी झाला होता. त्यात त्यांना दोन मुली व एक मुलगा अशी अपत्यं झाली. सुखी चाललेल्या संसारात पत्नीला कर्करोग झाला व त्यात दोन वर्षांपूर्वी पत्नीचे निधन झाल्यामुळे लेकरावरील मायेचे छत्र हरवले. तर अयोध्या यांचा नवरा व्यसनाच्या आहारी जाऊन घरातून पळून गेला. तिला एक लहान मुलगी आहे. नवरा पळून जाण्याने मुलीवरील बापाचे छत्र हरवले होते.

विशेष म्हणजे रविकांत आणि अयोध्या या दोघांच्याही वडिलांचे निधन झाल्यामुळे यांचे भवितव्य अंधारात होते. अयोध्या व रविकांत यांचा पुनर्विवाह करण्याच्या विचाराने हा योगायोग जुळून आला. हा विवाह उमरगा शहरातील बहुजन हिताय वसतिगृह येथे बौद्ध धम्म पध्दतीने संपन्न झाला. धम्मचारी प्रज्ञाजित यांनी रविकांत व अयोध्या यांचा विवाह लावण्यात आला. प्रा संजीव कांबळे, ग्रामपंचायतीचे सदस्य गोविंद कांबळे, प्रा उत्तम कांबळे यानी समुपदेशन करुन व विचार पटवून प्रयत्न केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा. किरण सगर यांची प्रमुख उपस्थिती होती.

Top