तुळजापूर / प्रतिनिधी -  

 तालुका प्रहार अपंग क्रांती आंदोलनच्या वतीने  वासुदेव गल्लीतील पाच  गरजु दिव्यांग  बांधवांना छतासाठी लोखंडी  पञे भेट देवुन जलसंपदा राज्यमंञी बच्चु कडू यांनी   दिलेला  मानवतेचा मंत्र जपण्याचा प्रयत्न संघटनेच्या वतीने करण्यात  आला.  

गरजूंना छतासाठी पत्रे सामाजिक वन अधिकारी  मनोहर पुंड यांच्या हस्ते व जिल्हा अध्यक्ष मयुर काकडे, जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ मोहिते, जिल्हा संघटक बाळासाहेब कसबे, श्री. बाळासाहेब पाटील, जिल्हा उपाध्यक्ष महादेव खंडाळकर, जिल्हा कार्याध्यक्ष  शशिकांत मुळे,   नागेश कुलकर्णी, बाळासाहेब कावरे,  बिभीषण गुंड,  शारदा जाधव, अलका इटकर आदींच्या उपस्थितीत देण्यात आले. यावेळी प्रहारचे  कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष पवार गजेंद्र व्यवहारे यांनी परिश्रम घेतले.

 
Top