उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या सदस्या तथा राष्ट्रवादी काँग्रेस युवती प्रदेशाध्यक्षा कुमारी सक्षणा ताई सलगर यांना काही गावगुंडांनी शनिवारी दिनांक 3 जुलै रोजी संध्याकाळी 06 वाजून 14 मिनिटांनी फोनवर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून धमकी दिलेली आहे. सदरील व्यक्तींनी गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते आहोत असाही उल्लेख केला आहे. एका महिला, मुलींना अपमानास्पद व लज्जास्पद भाषेत बोलणे हा गुन्हा असून सदर व्यक्ती विरोधात कठोर कार्यवाही करून एक चांगला सामाजिक पायंडा घालावा. कुमारी सक्षणाताई सलगर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्ष असल्याने त्या महाराष्ट्रभर दौरा करत असून संदर्भीय धमकीच्या अनुषंगाने त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे  या मागण्यांचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा.सुरेश दाजी बिराजदार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राजतीलक रौशन यांना दिले.

 प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसाभा अध्यक्ष अमित  शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष वाजिद पठाण, शहराध्यक्ष आयाज शेख,तालुका कार्याध्यक्ष नानासाहेब जमदाडे, नगरसेवक गणेश खोचरे,महेश नलावडे,प्रदेश युवक राष्ट्रवादीचे प्रशांत कवडे, वक्ता सेलचे प्रदेउपाध्यक्ष प्रा.तुषार वाघमारे,अमोल पाटील,रणजीत दांगट,धीरज घुटे,अभिजित जगताप इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


 
Top