तुळजापूर / प्रतिनिधी 

 नळदुर्ग तुळजापूर रोडवर संबंधित बांधकाम विभागाकडून,महामार्ग पोलीसांचे  सूचनेनुसार, नुकतेच पंधरा ठिकाणी अनावश्यक व धोकादायक गतिरोधक तयार करण्यात आले होते. 

 सदरील रोडवर वाहनांची वर्दळ ही अत्यंत कमी व हा रोड बहुतांश ठिकाणी निर्मनूष्य असल्याने रात्रीच्या वेळी गतिरोधक ओलांडण्यासाठी वाहनचालकांना आपल्या वाहनांचा वेग हा अतिशय कमी करावा लागतो यामुळे या ठिकाणी लूटमार करण्यासाठी चोरांना सोयीचे होईल.भविष्यात या रोडवर अनावश्यक गतिरोधकांमुळे धोका निर्माण होणार असून हे सर्व गतिरोधक काढण्यात यावेत.अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे  करण्यात आली होती .याबाबत नळदुर्ग शहर मनसेच्या वतीने,जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांच्या मार्गदर्शनानुसार,  वारंवार पाठपुरावा करण्यात आला.गेल्या चार दिवसापूर्वीच संबंधित अधिकार्यांनी भेट देऊन मनसेच्या जोतिबा येडगे,अलिम शेख, प्रमोद कुलकर्णी या पदाधिकार्यांना सोबत घेऊन,  या सर्व अनावश्यक व धोकादायक गतिरोधकांची पाहणी करून हे सर्व गतिरोधक तात्काळ काढण्यात येतील.असे आश्वासनही दिले होते. 

अखेर दि.५ जुलै रोजी  सकाळी नळदुर्ग तुळजापूर रोडवरील सर्वच्या सर्व गतिरोधक काढण्यात आले. मनसेच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

 
Top