परंडा/ प्रतिनिधी- 

तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटेफळ येथे शालेय शिक्षण व कामगार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा कार्यक्रम मंगळवार दि.५ रोजी घेण्यात आला.

“अन्न, वस्त्र, निवारा हा मुलमंत्र जपूया,ख-या गरजुंना सहारा आधार देऊ या.” माझ्या वाढदिवसाला कोणतेही बॅनर, पोस्टर, हारतुरे अशा वायफळ गोष्टींवर खर्च न करता गरीब गरजू व्यक्तींना अन्नधान्य किंवा गळणा-या घरावर टिनपत्रे देऊन हक्काचे छत देऊन वाढदिवस साजरा करावा याच माझ्यासाठी शूभेच्छा असतील हा संदेश सर्व प्रहार मावळ्यांना दिला होता.

प्रहार शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना राज्याध्यक्ष विकास घुगे,संजय बागडी, कृष्णा बोदेले, दत्तात्रय पुरी यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवून बच्चूभाऊ कडू राज्यमंत्री यांचे वाढदिवसा निमित्त सामाजिक उपक्रम सप्ताहाचे आयोजन केले होते.

याच अनुषंगाने परंडा तालुक्यातील वाटेफळ येथे जवळजवळ सात अंध,निराधार, विधवा महिलांना  किराणा सामानाचे किट वाटप करण्यात आले.एका किट मध्ये २ कि.साखर,१कि.शेंगदाणे,१ गोडेतेल पिशवी,चहा पावडर, खोबरेल,पोहे,१डझन बिस्कीट पुढे,२ संतूर साबण अशा मूलभूत  वस्तूंचा समावेश होता.गरीब गरजूंच्या चेह-यावर आनंद फुलवणे हीच प्रहार परिवाराची शिकवण व कार्यपद्धती आहे.

यावेळी प्रहार शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे राज्य समन्वयक दत्तात्रय पुरी, जिल्हाध्यक्ष वैजीनाथ सावंत, जिल्हा नेते संतूक कडमपल्ले, परंडा तालुका अध्यक्ष विनोद सुरवसे, सचिव परशुराम लोहार,   महिला आघाडी प्रमुख ज्योती देशमुख, उपाध्यक्ष शहाजी झगडे, तालुका नेते लक्ष्मण औताडे, तालुका संघटक रमेश शिवणकर आदी.पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top