मुरुम/ प्रतिनिधी 

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोमवारी (दि.५) रोजी प्रहार जनशक्ती पक्ष, उमरगा तालुका यांच्या वतीने झाडांचे रोपण व पैसाची उधळपट्टी न करता एका गरीब कुटुंबीयाला आठ पत्रे देऊन मदत केली. येणेगुर येथील एका गरीब कुटुंबातील नागनाथ कृष्णात फुलारी यांना पत्रे देऊन अनोख्या पध्दतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. 

यावेळी उपस्थित राज्यमंत्री बच्चू कडू यांचे स्वीय सहाय्यक सातलींग स्वामी, उस्मानाबाद जिल्ह्याचे प्रहार क्रांती अपंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे, उमरगा तालुकाचे अजिम खजुरे, फारूख मुल्ला, ऋतिक सूर्यवंशी, हुसेन मुल्ला, मोहसीन शेख, खाजा मुल्ला, प्रदिप गायकवाड, जावेद नदाफ, येणेगुरचे ग्रामसेवक पी.टी.डावरे आदींसह जिल्ह्यातील प्रहार संघटनेचे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला. 

 
Top