लोहारा/प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्यातील महिलांवर अन्याय अत्याचार वाढले असुन हे तात्काळ थांबविण्यात यावे व लोहारा दस्तापुर येथील भुमिहिन शेतमजुरांना गट नं.98 मधील जमीन मोजणी करुन तात्काळ कबाला द्यावा, या मागणीसाठी लोहारा तालुका फकिरा ब्रिगेटचे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दि.5 जुलै 2021 रोजी रास्ता रोको आंदोलन करुन विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तसेच मागण्या मान्य न झाल्यास येत्या 15 दिवसात फकिरा ब्रिगेडच्या वतीने मराठवाड्यात आंदोलन करण्यात येईल,असा इशारा देण्यात आला आहे. 

या आंदोलनात फकिरा ब्रिगेड युवा जिल्हा उपाध्यक्ष विशाल रोडगे, तालुकाध्यक्ष लक्ष्मण खंडागळे, बळीराम रोडगे, राम सगट, कौशल्या कांबळे, भारत लोंढे, कांताबाई लोंढे, अल्का लोंढे, रुक्मिणी माळे, छगुबाई देडे, पारुबाई कुरलेकर, शांताबाई चौधरी, संगीता रोडगे, विजया रोडगे, आकाश रोडगे, अभिजित रोडगे, रवि झुंझारे, आदींने भाग घेतला होता.  यावेळी पोलीस निरीक्षक धरमसिंग चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक ए.एन.वाठोरे, सदाशिव पांचाळ, सचिन दसवंत यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.


 
Top