उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद शहरातील वाढीव मालमत्ता धारकांची प्रलंबित करांविषयीची प्रकरणे तडजोडीसाठी लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आली असल्याची नोटीस मिळाल्याने मंगळवार, दि. 27 जुलै रोजी फूक संघटनेतर्फे नगर परिषदेचे मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे यांना निवेदन देऊन जनतेच्या वतीने कैफित मांडण्यात आली.

 उस्मानाबाद शहरातील मालमत्ता धारकांना 2018 साली पाच ते दहापट वाढीव मालमत्ताकराच्या नोटीस देण्यात आल्या होत्या. याप्रकरणी त्याचवेळी हरकती दाखल करुनही याबाबत सुनावणी झालेली नाही. याबाबत 1 ऑगस्ट रोजी संबंधित मालमत्ताकर धारकांनी लोकअदालत मध्ये हजर राहण्याच्या नोटीसा मिळाल्यानंतर आज शहरातील नागरिकांनी व फूक संघटनेने मुख्याधिकार्‍यांची भेट घेऊन कैफियत मांडून निवेदन दिले. निवेदनावर फूक संघटनेचे अध्यक्ष एम.डी.देशमुख, सचिव धर्मवीर कदम, उपाध्यक्ष मुकेश नायगांवकर, शहाजी कापसे, सहसचिव गणेश वाघमारे, राजू गरड, सरफराज जिकरे यांची स्वाक्षरी आहे.


 कोवीडच्या  संकटामळे दोन वर्षांत कर निर्धारण समितीची बैठक झाली नाही. त्यामुळे सदर प्रकरणे लोकअदालतीमध्ये गेल्याचे व याबाबत लवकरच समितीची बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढून प्रकरणे निकाली काढण्यात येतील. 

हरिकल्याण येलगट्टे - मुख्याधिकारी, नगर परिषद उस्मानबाद’’


 
Top