उस्मानाबाद / प्रतिनिधी-

प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत जिल्ह्यातील चालू असलेल्या रस्त्याची गुणवत्ता वाढवा, अशा सूचना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिल्या आहेत. 

जिल्हा परिषद सभागृह,  उस्मानाबाद  येथे जिल्हास्तरीय दिशा समिती बैठक उस्मानाबाद  लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत जिल्ह्यातील चालू असलेल्या रस्त्याची गुणवत्ता वाढवावी. गुणवत्ता दर्शक पथकाद्व्यारे पाहणी करण्यात यावी. पाच वर्षे देखभाल दुरुस्ती असलेले रस्ते दुरुस्त करावेत. प्रत्येक गावात निराधार लाभार्थ्यांचे सर्व्हे तलाठी यांनी करावेत व निराधार लाभार्थ्यांना न्याय देण्यात यावा. तसेच जिल्हा बँकेने निराधारांच्या पगारी देण्यात याव्यात. या योजनासाठी माझी टीम तयार करत आहे. १५ ऑगस्ट पर्यंत शासनांच्या योजनांची माहिती दर्शनी भागावर लावण्यात यावी. खरिप पिक विमा भरताना ७/१२, गाव, ऑनलाईन दिसत नाही अशा तक्रारी येऊ देऊ नका. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत केलेल्या कामाचे मस्टर काढण्यास दिरंगाई करू नये. शेतकऱ्यांचे शेत रस्ते मोकळे करण्याची मोहिम या योजने मधुन करावी. प्रशासनाने या कामात उल्हास दाखवावा. प्रत्येक गावात किमान २ कामे चालू ठेवावीत. तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी प्रत्येकी १-१ काम चालू करावे. प्रधानमंत्री उज्वला योजने अंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांनी गॅस कनेक्शन देण्यात यावे. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना अंतर्गत प्रशिक्षण घेण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना कंपन्या मध्ये जॉब भेटला आहे का याची खातर जमा करावीत. रेल्वे विभागामार्फत जे साईट रस्ते केले आहेत. त्या रस्त्यांची दुरुस्ती करावी. प्रामुख्याने भिकारसारोळा, खामगाव, बुकणवाडी येथिल रस्ते दुरुस्त करावेत. वेगवेगळ्या विभागातील ज्या कंत्राटदाराकडे पहिली कामे प्रलंबित आहेत. त्यांना नविन कामे देऊ नये अशा कंत्राटदाराचा ब्लॅक लिस्ट प्रस्ताव पाठवावा. तसेच मागील बैठकीला गैरहजर असलेले व अनुपालन अहवाल सादर न केलेल्या अधिकारी यांच्यावर कार्यवाही करण्याबाबत अहवाल जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनाकडे पाठवण्यात यावा. यासह केंद्र सरकारच्या योजनाच्या कामाचा आढावा माहिती घेण्यात आली. व संबंधित विभागास आवश्यकत्या सुचना खासदार यांनी केल्या.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ.कैलास घाडगे-पाटील, नगराध्यक्ष नंदूभैय्या राजेनिंबाळकर, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, दिशा समिती सदस्य कांचनमाला संगवे, नगसेवक गटनेते तथा नगसेवक सोमनाथ गुरव, आदी दिशा समिती चे सर्व सन्माननीय सदस्य तसेच जिल्हास्तरिय सर्व योजनेचे अधिकारी उपस्थित होते.


 
Top