उस्मानाबाद/प्रतिनिधी

कृषी कर्मचारी पतसंस्थेचे माजी चेअरमन दिलीप भानुदासराव काकडे (६१) यांचे शुक्रवार दि. १६ जुलै रोजी रात्री १० च्या दरम्यान ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने चिकमंगलूर (कर्नाटक) येथे निधन झाले. त्याच्या पश्चात आई, पत्नी, चार मुली,एक मुलगा, भाऊ, बहीणी, भाच्चे, पुतणे असा परिवार आहे.दिलीप काकडे हे माजी नगराध्यक्ष सुनिल काकडे यांचे चुलत बंधु होते. 

उस्मानाबाद कृषी कार्यालयातील निवृत्त तालुका कृषी अधिकारी तथा प्रगतिशिल शेतकरी दिलीप भानूदासराव काकडे हे मित्र परिवारासह कर्नाटक राज्यात फिरायला गेले होते. चिकमंगलूर येथे शुक्रवारी रात्री त्यांना ह्दय विकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यंाचे निधन झाले. शनिवार दि. १७ जुलै रोजी सकाळी त्यांचा पार्थिव उस्मानाबादकडे घेऊन त्यांचे मित्रपरिवार निघाले होते. दिलीप काकडे यांनी भूम-परंडा आदींसह जिल्हयात विविध ठिकाणी काम केले होते. शेतकरी वर्गांना मदत करणारा अधिकारी अशी त्यांची ख्याती होती. 

 
Top