तुळजापूर / प्रतिनिधी-

तुळजापूर तालुकास्तरीय  भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक मागील दोन वर्षा पासुन  झालेली नाही तरी ती लवकर घेण्यात यावी, अशी मागणी तालुकास्तरीय भष्ट्राचार निमुर्लन समिती अशासकिय सदस्य  धनाजी कुरुंद यांनी समितीचे सचिव  तथा तहसिलदार यांना निवेदन देवुन केली आहे.

 तुळजापूर तालुकास्तरीय भष्ट्राचार निर्मुलन समितीची गेल्या दोन वर्षापासून आजपर्यंत बैठक झालेली नाही . तरी मा.उपविभागीय दंडाधिकारी  यांचे अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात यावी , बैठकीस सर्व शासकीय सदस्य अशासकीय सदस्य यांना बैठकीस येणेसाठी पत्र देण्यात यावे व त्वरीत बैठक घेण्यात यावे अशी मागणी केली आहे.

सदरील निवेदन प्रत मा.जिल्हाधिकारी , उस्मानाबाद मा.उपविभागीय दंडाधिकारी यांना सादर केल्या आहेत.


 
Top