तुळजापूर / प्रतिनिधी-

जवाहर नवोदय विद्यालयाची (तुळजापूर , जि . उस्मानाबाद)  इयत्ता सहावीची निवड चाचणी परीक्षा ११ ऑगस्ट २०२१ रोजी घेण्यात येणार आहे . 

 केंद्र सरकारच्या अंतर्गत शिक्षण मंत्रालय , नवी दिल्ली द्वारा  चालविल्या जाणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालय तुळजापूर येथे शैक्षणिक सत्र २०२१ - २२ साठी होणारी नवोदय निवड चाचणी परीक्षा ( इयत्ता सहावी ) दिनांक ११ जुलै रोजी घेण्यात येणार आहे. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी व तसेच परिक्षा हॉल टिकट डाउनलोड करावे, असे आवाहन नवोदय विद्यालयाचे प्राचार्य के.वाय. इंगळे यांनी केले आहे.

 
Top