तुळजापूर / प्रतिनिधी-

 तालुक्यातील आलियाबाद येथे राज्य शासनाचा दलित मित्र पुरस्कार प्राप्त केलेले समाजभूषण मोतीराम चव्हाण यांच्या स्मृतीदिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.आलियाबाद येथील राजश्री शाहू महाविद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करून शेतकऱ्यांना फळांचे झाडे वाटप करण्यात आले. तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने घनदाट वृक्षलागवड यांचा शुभारंभ ही करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण, जळकोटचे सरपंच अशोकराव पाटील, मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे, भारती विद्यापीठाचे संचालक डॉ, गणेश राठोड, नायब तहसीलदार माणिकराव चव्हाण, अमृता चव्हाण, नेमिनाथ चव्हाण,शिवसेनेचे तालुका उपप्रमुख कृष्णात मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष महेश कदम, डॉ.अंकुश कदम, उपसरपंच पती बसवराज कवठे, नारायण पटणे,पंडित कदम,  विविध कार्यकारी सोसायटी चे चेअरमन राजु पाटील, सेवानिवृत्त गटविकास अधिकारी ताराचंद चव्हाण, शंकर चव्हाण,शिक्षण विस्तार अधिकारी डॉ वाय.के.चव्हाण ,टी.आर.राठोड, बाबुराव पवार, आलियाबादच्या सरपंच ज्योतीका चव्हाण, उपसरपंच सुर्यकांत राठोड, ग्रा.प.सदस्य रामचंद्र पवार, थावरू राठोड, सिताराम राठोड, पोलीस पाटील शिवाजी चव्हाण, ताराचंद राठोड, शकंर राठोड,लक्ष्मण राठोड, शिवाजी राठोड, सुभाष नाईक, गणेश राठोड, शिवाजी चव्हाण, विनायक चव्हाण,मुख्याध्यापक सुर्यकांत चव्हाण, प्राचार्य संतोष चव्हाण,अमोल चव्हाण, विनायक राठोड यांच्या सह सर्व प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेचे शिक्षक वृंद उपस्थित होते.


 
Top