परंडा / प्रतिनिधी :- 

शालेय शिक्षण व कामगार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांचे वाढदिवसाचे औचित्य साधत माणीकनगर जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण करण्यात आले.प्रहार शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवून राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांचे वाढदिवसा निमित्त सामाजिक उपक्रम सप्ताहाचे आयोजन केले होते.

कोविड-१९ च्या महामारीने संपूर्ण जगा सह महाराष्ट्र हतबल झालेला आहे, सर्व सामान्य कुटुंबातील कितीतरी व्यक्ती ऑक्सिजनच्या अभावी किंवा कमतरतेमुळे मृत्यू पावले, कृत्रिम ऑक्सिजन हा माणसाला पुरेसा होत नाही हे कोरोनाने संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे. म्हणून मोफत आणि मुबलक ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात सहज उपलब्ध होण्यासाठी वृक्षारोपण करणे ही काळाची गरज नसून ती आपली मुलभूत गरज बनली आहे.वाढदिवसा निमित्त मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करावी याच माझ्यासाठी शुभेच्छा असतील हा संदेश सर्व प्रहार मावळ्यांना दिला होता.

    याचाच एक भाग म्हणून माणीकनगर जिल्हा परिषद शाळेत वड आणि पिंपळ या वृक्षाची लागवड करण्यात आली.

यावेळी प्रहार शिक्षक-शिक्षकेत्तर संघटना  राज्य समन्वयक दत्तात्रय पुरी, जिल्हाध्यक्ष वैजीनाथ सावंत, जिल्हा कोषाध्यक्ष रघुनाथ दैन, जिल्हा नेते संतूक कडमपल्ले, तालुका सचिव परशुराम लोहार, तालुका महिला आघाडी प्रमुख ज्योती देशमुख, तालुका नेते लक्ष्मण औताडे आदि.पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top