तेर / प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्यात सर्वात प्राचीन मंदिर असलेले उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील त्रिविक्रम मंदिराचा लाकडी मंडपाच्या भिंतीला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे लाकडी मंडप पडण्याच्या मार्गावर आहे, याकडे  पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्ष झाले आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे महाराष्ट्र राज्यात सर्वात प्राचीन मंदिर असलेले त्रिविक्रम मंदिर असून मंदिराच्या गर्भगृहासमोर लाकडी मंडप असून याच लाकडी मंडपात संत मेळा भरत असे. लाकडी मंडपाच्या मध्ये चार स्तंभ असून त्याच्याभोवती आणखी चार लाकडी स्तंभ आहेत. लाकडी मंडपाच्या मुख्य चार स्तंभाच्या मध्ये पुष्प वर्तुळ असून अत्यंत उत्कृष्ट कलाकुसर त्यावर केलेली आहे. हा लाकडी मंडप अनेक वर्षापासून  पावसाळ्यात पूर्णपणे गळतो त्याच प्रमाणे या लाकडी मंडपाच्या भिंतीला अनेक ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत. त्यामुळे हा लाकडी मंडप मोठा पाऊस पडल्यावर कधी कोसळेल अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. पुरातत्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची तात्काळ दखल घेऊन लाकडी मंडप सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून प्रामाणिकपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. 


 
Top