तेर / प्रतिनिधी

कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे बेकारी वाढलेली आहे म्हणून सुशिक्षित बेकार यांचे सर्वेक्षण करून त्यांना प्रतिमहा दहा हजार रुपये बेकारी भत्ता देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे तेर येथे कानिफनाथ देवकुळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली आहे.

कोविड या महामारीमुळे गरीब ,मध्यमवर्गीय आणि मागासवर्गीय समाज आर्थिक दारिद्र्याच्या खाईत लोटला गेला आहे. त्यामुळे त्यांच्यापुढे उदरनिर्वाहाचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे गावनिहाय सर्वेक्षण करून त्यांना तातडीने मदत करावी, कोविडमुळे  अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे बेकारीचे प्रमाण वाढलेले आहे म्हणून सुशिक्षित बेकार यांचे सर्वेक्षण करून त्यांना प्रतिमा महा दहा हजार रुपये बेकारी भत्ता देण्यात यावा, कोरोनामुळे मृत पावलेल्या कुटुंबियांना किमान चार लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी. वरील मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्या अंमलात आणण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे तेर येथे कानिफनाथ देवकुळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली आहे.


 
Top