उस्मानाबाद/प्रतिनिधी

कोविडच्या दुसऱ्या लाटेनंतर  मेडिकल ऑक्सिजनच्या बाबतीत जिल्ह्यास स्वयंपूर्ण करण्याची तयारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती आणि आरोग्य विभागाने केली आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यात काही ऑक्सिजन प्लांटचे काम पूर्ण झाले आहे  तर काही ठिकाणचे काम सुरू झाले आहे . याही ऑक्सिजन प्लांटचे काम लवकरच पूर्ण होईल,असा विश्वास जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी व्यक्त केला आहे .                                  

  या अनुषंगाने जिल्हा रुग्णालयात  13 के एल लिक्विड ऑक्सीाजन टँक (LMO) दाखल झाला आहे. टँक बसवण्यालचे काम अंतिम टप्यात आहे .  कोविडच्या दुसऱ्या लाटेच्या  दरम्यातन मे महिन्यात   14 मे 2021 रोजी लिक्विेड ऑक्सीकजनची मागणी 19.5 KL  प्रतीदिन इतकी वाढली होती. जिल्हायाला होणारा ऑक्सीकजन पुरवठा हा मुख्यतः पुणे, हैदराबाद सारख्या शहरातून  होत असल्याने आणिबाणीच्या  प्रसंगी पुरेसा साठा  तयार असणे आवश्यक आहे. त्या नुसार जिल्ह्यात  कार्यवाही केली जात आहे.

  लिक्विड ऑक्सीजन टँकचे काम येथील जिल्हा रुग्णायलयात सुरू असून त्याची क्षमता-10 KL आहे. सद्यस्थिती हा टॅंक कार्यान्वित आहे .तामलवाडी येतील गोरज गॅसची क्षमता -11 KL हा खाजगी आहे . हा सध्या  सुरु आहे. येथील जिल्हा रुग्णालयातील टॅन्कची  क्षमता -13 KL असून सद्यस्थित  टँक प्राप्त झाला आहे. उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्याचे कार्यान्वायन 10 दिवसात होणार आहे. तुळजापूर येथील  उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन टॅन्कची  क्षमता -13 KL असून त्याची उभारणी सुरू आहे. येत्या  15 ऑगस्टपर्यंत तो कार्यान्वित होण्याची  अपेक्षा आहे. या सर्व ठिकाणावरून जिल्ह्यास  एकूण-47 KL. ऑक्सिजन लिक्विड ऑक्सिजन प्राप्त होणार आहे.

  या व्यतिरिक्त डयुरा सिलेंडर्स भरण्यासाठी 20 KL क्षमतेचा साठवणूक टँक ची  प्राथमिक प्रक्रिया सुरु आहे.  तसेच खाजगी प्रकल्पा बाबत महाव्यवस्थारपक जिल्हा उद्योग केंद्र उस्मारनाबाद यांच्या स्तरावरुन  पाठपुरावा सुरु आहे.

या सर्व शासकीय व खाजगी प्रकल्पांच्या माध्यदमातून ऑक्सी‍जन पुरवठा सुरळीत करण्यासचे प्रयत्न‍ सुरु आहेत. याच जोडीला तालुक्यातील तहसिलदार, वैद्यकीय अधीक्षक व तालुका आरोग्य अधिकारी यांनी दि. 22 जुलै-2021 पर्यंत ऑक्सीजन व्यसवस्थावपन आराखडे, रुग्णालयांची क्षमता व गरज लक्षात घेऊन तयार करण्याचे आदेश जिल्हांधिका-यांनी दिले आहेत.

 
Top