वाशी / प्रतिनिधी-

 महिला काँग्रेसच्या वतीने वाशी येथे    दि 25 जुलै  रोजी सौ. स्नेहल स्वामी यांच्या निवासस्थानी  महिला ता.काँग्रेस कमेटीची बैठक घेण्यात आली.महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष   बसवराज पाटील  , माजी मंत्री मधुकररावजी चव्हाण  , महिला जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी गायकवाड यांच्या आदेशानुसार  महीला तालुका काँग्रेस कमेटी च्या कार्यकरणीची निवडी महिला जिल्हा सरचिटणीस सौ.स्नेहल स्वामी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. 

तालुका अध्यक्ष पदी सौ. निकिता देशमुख, उपाध्यक्ष पदी सौ. कल्पना जाधव, वाशी शहर अध्यक्ष पदी सौ. संजीवनी गवारे, सचिव पदी सौ.निर्मला देशमुख,चिटणीस सौ. कविता भुजंग लगाडे, सदस्य पदी सौ.आरती देशमुख, सदस्य पदी सरस्वती बोडके यांच्या निवडीचे पत्र ज्येष्ठ  नेते शिवाजी बाप्पा सांडसे,सौ.स्नेहल स्वामी,राजेश शिंदे,अवधुत क्षिरसागर, अमर तागडे,अमोल बोडके यांच्या हस्ते नियुक्ती चे पत्र देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमात बोलताना युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस अवधुत क्षिरसागर यांनी म्हटले की, आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस च्या महिलांनी पुढाकार घेऊन जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणावेत.व काँग्रेस संघटना बळकट करावी काँग्रेसचे विचार ध्येय धोरण तळागाळात पोहचवले पाहीजे. यावेळी कार्यक्रमास उपस्थित ज्येष्ठ नेते शिवाजी बाप्पा सांडसे,महिला जिल्हासरचिटणीस स्नेहल स्वामी,युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अमर तागडे, युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस अवधुत क्षिरसागर,वाशी ता.अध्यक्ष राजेश शिंदे,ओबीसी सेल तालुका अध्यक्ष अमोल बोडके,तालुका अध्यक्ष सौ.निकिता देशमुख,उपाध्यक्ष सौ.कल्पना जाधव,सचिव निर्मला देशमुख, शहर अध्यक्ष सौ.संजीवनी गवारे,सदस्य सौ.सरस्वती बोडके,सदस्य सौ.आरती देशमुख व सर्व महिला कार्यकर्ती पदादीकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अमर तागडे यांनी केले.

 
Top