उस्मानाबाद / प्रतिनिधी-

विविध गुन्ह्यातील चार आराेपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली आहे. आंबी पोलिस ठाण्यात दाखल चार गुन्ह्यात शिक्षा सुनावल्या आहेत.

कोविड-१९ संबंधी मनाई आदेशांचे उल्लंघन करून संसर्गाची शक्यता निर्माण करून उल्लंघन केल्याप्ररकणी आप्पू अनिल खर्डे (रा. वाटेफळ), बाबासाहेब हनुमंत बिबे (रा. कुक्कडगाव) या दोघांना प्रत्येकी ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास तीन दिवस साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करून नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी नाजोद्दीन ताजोद्दीन शेख (रा. अनाळा) यांना २०० रुपये दंड व दंड न भरल्यास दोन दिवस साध्या कारावासाची शिक्षा आणि नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रामचंद्र राऊत (रा. तांदुळवाडी) यांना ३०० दंड व दंड न भरल्यास दहा दिवस साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.


 
Top