तुळजापूर / प्रतिनिधी-

 तालुक्यातील  सोलापूर -उस्मानाबाद नँशनल हायवे ३६१ वरील  सांगवीमार्डी गावाजवळ छोटा हत्ती वाहनातुन बैलास नेत असताना बैलासह वाहनास ताब्यात घेवुन दोन लाख बत्तीस हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करुन या प्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवार दि.२० रोजी सकाळी ८.४५  वाजता करण्यात आली.

या बाबतीत अधिक माहीती अशी की, मंगळवार दि.20  रोजी  सकाळी 8.45 वा.सुमारास सांगवी -मार्डी गावाजळ उस्मानाबाद ते सोलापुर NH 361 रोडवर  सांगवी -मार्डी गावाजळ उस्मानाबाद ते सोलापुर NH 361 रोडवर एक टाटा कंपनीचा छोटा हात्ती (क्र एम.एच .25 पी .2042) मध्ये बैलाची वाहतुक करून त्याला त्रास होईल, अशा रितीने कोंबुन त्याला निर्दयतेने वागनुक देवुन त्याचे चारापण्याची कोणतेही व्यवस्था न करता वाहतुक केल्याचे दिसुन येताच वाहन व बैल व ज्ञानेश्वर नागनाथ कोकाटे (रा सांजा रोड उस्मानाबाद)  व सय्यद नसरोद्दीन मोईजोद्दीन कादरी (रा  भाग्यनगर उस्मानाबाद) यांना ताब्यात घेतले यांच्या कडे   बैला बाबत कागदपत्रे मागणी केली असता  कोणतेही कागदपत्राची पुर्तता  त्यांनी केली नाही

यावरुन पो.नि.काशीद सो , यांचे आदेशाने गुरंन 243/21कलम 11(1)(ए)(डी )( एच) प्राण्यांना क्रुरतेने वागणूक प्रतिबंध अधिनियम  1960 व कलम 119 महाराष्ट्रपोलिसकायदाअधिनियम 1951अन्वय पो काँ  संतोष पवार यांनी दिलेल्या फिर्याद वरुन गुन्हा दाखल केला असुन  पुढील तपास पो.ना 1338 राठोड यांचेकडे देण्यात आली आहे .

 
Top