तुळजापूर / प्रतिनिधी-

महाराष्ट्र राज्यात बहुचर्चित असलेल्या तिर्थक्षेञ तुळजापूरच्या आगामी  नगरपरिषद निवडणूक  पार्श्वभूमीवर निवडणुक पुर्व राजकिय पटलावारील गुप्त  हालचालीं  सुरु  झाल्या आहेत.  आघाडी की पक्षा कडुन लढणे सोयीस्कर ठरेल याची चाचपणी प्रमुख पक्षाचे नेते करीत आहेत.

नगरपरिषद निवडणूक  मुदतीत होणार कि नाही या बाबतीत शासनाकडून स्पष्ट आदेश नसले तरी पक्ष व इच्छुक तयारीस लागले आहेत. मतदारांना आपल्याकडे  आकर्षित करण्यासाठी इछुक वेगवेगळे फंडे राबवत आहेत.प्रभाग कि वार्ड याबाबतीत अद्याप अनिश्चितता असली तरीही इच्छुक मतदारांशी वेगवेगळ्या मार्गाने संपर्क साधत आहेत. तिर्थक्षेञ तुळजापूर नगरपरिषद राज्यात बहुचर्चित नगरपरिषद आहे. येथील नगराध्यक्ष हे मानाचे असल्याने या पदावर विराजमान होण्यासाठी प्रचंड चुरस असती

 या नगरपरिषद वर स्थापने पासुन पन्नास वर्ष शेकाप चे वर्चस्व होते नंतर राष्ट्रवादी काँग्रेस व सध्या  तुळजापूरचे अामदार राणजगजितसिंहजी पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस मधुन भाजपा  मध्ये जावुन आमदार झाल्याने  नगरपरिषदवर सध्या अामदार राणजगजितसिंहजी पाटील यांचे वर्चस्व आहे. सध्या सर्वच पक्ष तुळजापूर नगरपरिषद निवडणुक लढवणे पुर्व  प्रक्रिया काळजी पुर्वक हाताळत आहे. कुठलाही पक्ष आपले पत्ते खोलण्यास तयार नाही,  थांबा व वाट पहा ही भूमिका घेतल्याचे दिसुन येत आहे.

तुळजापूर नगरपरिषद चे राजकीय समीकरणे प्रत्येक निवडणुकीला बदलत असतात  यंदा काय राजकीय  समीकरणे  तयार होणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.  एकदंरीत या निवडणुक लढतीचे स्पष्ट चिञ माञ उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवशी दिसणार आहे.

 
Top