उस्मानाबाद / प्रतिनिधी

 अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा ०९ जुलै रोजी स्थापना दिन आहे. देशभर हा दिवस राष्ट्रीय विद्यार्थी दिन म्हणून विविध कार्यक्रम उपक्रमांनी साजरा केला जातो,या निमित्ताने उस्मानाबाद शहरातील व्यंकटेश महाजन महाविद्यालयात भारत माता प्रतिमापूजन करण्यात आले तसेच या निमित्ताने महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण केले.अभाविपच्या पूर्व कार्यकर्त्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात वृक्षारोपण करून या विद्यार्थी दिनानिमित्त छोटेखानी कार्यक्रम करण्यात आला. प्रारंभी कै.व्यंकटेश महाजन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत चौधरी,विद्यार्थी परिषदेचे पूर्व कार्यकर्ते ॲड अजितसिंह कुलकर्णी , नितीन नायर , देविदास पाठक ,संदिपान गायकवाड ,सौ  सविता बाविकर - कुलकर्णी ,यांच्या हस्ते भारत माता प्रतिमा पूजन करण्यात आले.यावेळी अभाविपचे धाराशिव तालुका प्रमुख नितेश कोकाटे , जिल्हा संघटन मंत्री गंगाधर कोलमवार यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात  देवीदास पाठक यांनी अभाविपच्या स्थापनेचा थोडक्यात आढावा घेतला.,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विद्यार्थी परिषदेची स्थापना मागील ७२ वर्षांपूर्वी करण्यात आली ,विद्यार्थी परिषदेने घडवलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी समाजाच्या वेग - वेगळ्या क्षेत्रात जाऊन राष्ट्रभक्तीच्या व्यवहाराने सामाजिक बांधिलकी ठेवून अनेक सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत ,प्रकल्प तसेच रचनात्मक सामाजिक कार्य उभारले आहे, असे त्यांनी सांगितले.महाविद्यालयातील प्राध्यापकांनी ही विद्यार्थ्यांपर्यंत राष्ट्रभक्तीचा विचार विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पोहोचवण्यासाठी कार्य करण्याचे आवाहन पत्रकार श्री देविदास पाठक यांनी यावेळी केले.

यानंतर महाविद्यालय परिसरात प्राचार्य चौधरी सर तसेच अभाविप पूर्व कार्यकर्ते ,महाविद्यालयातील प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा चा वर्धापन दिन संपन्न झाला.


 
Top