परंडा / प्रतिनिधी :-
संभाजी बिग्रेड च्या उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्ष पदी राजकुमार भैया देशमुख व परंडा तालुका अध्यक्ष पदी समाधान खुळे व तालुका उपाध्यक्ष राहुल ठोंगे व तालुका कार्यआध्यक्ष पदी अमोल भैया गोडगे यांची निवड झाल्याबद्दल मी वडार महाराष्ट्राचा संघटना परंडा तालुक्याच्या वतीने बुधवार दि.७ रोजी येथी संभाजी ब्रिगेड च्या कायालयात सत्कार करण्यात आला.
त्यावेळी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश ईटकर, जिल्हा उपाध्यक्ष सुनिल भाऊ पवार भोञेकर तसेच अजिनाथ काका शेळके, भारत जाधव, दिलीप पवार, दादा ईटकर, उमेश सुकूळे, अविनाश जाधव, संदिप गाढवे ,प्रविण पवार, अमर पवार, संदिप देशमुख, विजय घुले, अनिल पवार, रणजित पवार, अविनाश गोफणे, उत्तम शिंदे व शंकर पवार, रामभाऊ देशमुख आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.शेवटी खुळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.