कळंब  / प्रतिनिधी-

 येथील जिल्हा परिषद प्रशाला (मुलींची) या शाळेत मागील अनेक वर्षांपासून परीचर पदी कार्यरत असणाऱ्या श्रीमती.सुनंदा सुक्ते/भांडे या  दि.३० जून रोजी सेवा निवृत्त झाल्या,या प्रसंगी त्यांना निरोप देताना सर्व शिक्षक,शिक्षीका व शिक्षीकेत्तर कर्मचारी यांना गहिवरून आले होते,परीचर पदावर असूनही आपल्या शांत,संयमी,शिस्तबद्ध व कर्तव्यदक्ष स्वभावामुळे त्यांना जिल्हाभरातील अनेक कर्मचारी व अधिकारी हक्काने “सुक्ते मावशी” म्हणून ओळखतात.प्रशालेतील कर्मचार्‍यांच्या वतीने शाल,श्रीफळ,साडी व पुष्पहार देवून त्यांचा सन्मान करण्यात आला.

आई प्रमाणे सर्वांना माया लावणाऱ्या “सुक्ते मावशीं”ना निरोप देताना सर्वांच्याच डोळ्यात अश्रू दाटून आले होते.या प्रसंगी प्रशालेच्या (मुख्याध्यापक) बि.डी.कदम,यांचेसह श्रीमती.अहील्या भंडे,जाधव ए.सी.,वाघमारे ए.बी.,कांबळे एन.व्ही.,सूर्यकांत वाघमारे,पवार डि.ओ.,तापले जी.बी.,श्रीमती सारीका माळी,झोंबाडे,तिडके असे शिक्षक व शिक्षीकेत्तर कर्मचारी उपस्थीत होते.

 
Top