उस्मानाबाद / प्रतिनिधी-

सद्यस्थितीत राज्यात कोविड-19 प्रार्दुभावामुळे जिल्हा आणि स्थानिक आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे.त्यामुळे काही ठिकाणी हेल्थकेअर क्षेत्रात आवश्यक कुशल मनुष्यबळाची मेाठी कमतरता जाणवत आहे.त्याअनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास,रोजगार व उदयोजकता विभागाने राज्यात “मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम”आरोग्य क्षेत्रातील कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू केलेली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त तरुणांनी लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे.

 याकरिता आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असलेल्या जिल्हयातील 18 ते 45 वयोगटातील युवक-युवतींना आरोग्य क्षेत्रातील रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.त्यानुसार या  प्रशिक्षण योजना ही जिल्हयातील शासकीय हॉस्पीटल्स, मेडिकल संस्था,तसेच 20 पेक्षा जास्त बेड्स उपलब्ध असणाऱ्या खाजगी हॉस्पीटल्स यांच्यामार्फत राबविण्यात येणार आहेत.त्यासंबधातील प्रशिक्षण कोर्स ही निवडण्यात आलेले आहेत.

 या प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून हॉस्पीटलकडे उपलब्ध असलेल्या इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर करुन प्रामुख्याने ऑन जॉब ट्रेनिंगच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षण योजनेत आरोग्य्‍ विषयक कौशल्य्‍ प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी https://forms.gle/3f4DGZhHKG2oPDzC9 या गुगल फॉर्म लिंकच्या माध्यमातून आपली इच्छुकता नोंदविणे अनिवार्य आहे. यापुर्वी गुगल फॉर्म भरलेल्या उमेदवारांना नव्याने गुगल लिंक फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही.

 योजनेच्या अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र उस्मानाबाद कार्यालयाचा दूरध्वनी 02472-222236 अथवा osmanabadrojgar@gmail.com ईमेलवर संपर्क साधण्यात यावा.

 
Top