उस्मानाबाद /प्रतिनिधी-
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांस्कृतीक विभागाच्या वतीने मा. खा. संसद रत्न सुप्रियाताई सुळे यांचा वाढदिवस केक कापून व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करून साजरा करण्यात आला.
 माता रमाई महिला वाचनालय, भीम नगर, क्रांती चौक, उस्मानाबाद येथे सांस्कृतीक विभागाच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी कोरोना काळात आपली जबाबदरी पार पाडलेल्या विविध विभागातील महिलांचा गौरव हार, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन करण्यात आला, यामध्येआरोग्य विभागातील महिला कर्मचारी, नगर परिषद सफाई महिला कर्मचारी, पोलिस महिला कर्मचारी, मेहतर समाजातील महिला, लोककलावंत महिला  या विभागातील महिलांना सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमा प्रसंगी गौरव करण्यात आलेल्या महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले यामधे त्यांना या कोरोनाचा काळात किती अडचणींना सामोरे जावे लागले, त्या पूर्ण शहर स्वच्छ ठेवण्याचे काम चोख करत असताना त्यांना प्यायच्या पाण्याची देखील सोय होत नव्हती अशा परिस्थिती मधे देखील त्यांनी त्याची जबाबदारी पार पाडली त्यांनी सांगितले की आतापर्यंत त्यांचा सन्मान कधीच कोणीच केला नव्हता पण आज आदरणीय सुप्रियाताई यांच्या वाढदिवसानिमित्त विशाल शिंगाडे यांच्या प्रयत्नामुळे त्यांना जो मान मिळाला त्यामुळे त्यांनी खुप कौतुक केले व ताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आशीर्वाद दिले.
या कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा   मंजुषा मगर माता रमाई महिला वाचनालय अध्यक्षा  काशीबाई पवार सचिव शुभांगी बनसोडे व ज्येष्ठ नागरिक मा. शकुंतला शिंगाडे उपस्थीत होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सांस्कृतीक विभागाचे सौ. अर्चना टिळक उपस्थीत होत्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल शिंगाडे यांनी केले व आभार प्रदर्शन सागर चव्हान यांनी केले, या कार्यक्रमा प्रसंगी सांस्कृतीक विभागाचे उस्मानाबाद तालुकाध्यक्ष सागर चव्हान, शहराध्यक्ष सुगत सोनवणे, सचिव ताहेर शेख , अजय चीलवंत, महेश डवरे, सिद्धार्थ सोनवणे, सारीपूत शिंगाडे, सत्यजित माने, प्रफुल्ल वाघमारे, यश शिंगाडे, प्रशांत सोनवणे, सुहास झेंडे, अविनाश शिंगाडे, विजय हजारे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top