उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी आरोपी आशिष ढागणे यास उस्मानाबाद सत्र न्यायालयाने ७ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा दि. १९ जुलै रोजी ठोठवली आहे. 

 पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, आशिष ज्ञानोबा ढाकणे, रा. उस्मानाबाद याने श्रीमती मनिशा रामदत्त गिरी यांना ईमारतीच्या चौथ्या मजल्याच्या छतावरुन खाली टाकून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याने आनंदनगर पो.ठा. येथे गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक श्री. मोतीचंद राठोड यांनी करुन उस्मानाबाद सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.

 या सत्र खटला क्र. 754 / 2021 चा निकाल आज दि. 19 जुलै रोजी जाहिर होउन आरोपी- आशिष ढाकणे यास 7 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व 25,000 रू. दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.


 
Top