मुरुम / प्रतिनिधी -

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दिवसेंदिवस ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढतच असल्याने महापुरुषांच्या जयंत्या साध्या पद्धतीने साजरा होत आहेत. त्यामुळे लॉकडाउनच्या नियमांचे पालन करुन अहिल्यादेवी होळकर यांची २९६ वी जयंती देखील सोमवारी (ता.३१) रोजी अन्नदान करून साजरी करण्यात आली. जय मल्हार मित्र मंडळाच्या वतीने अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक समाज मंदिरात अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुजारी बिरू ढंगापूरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

 यावेळी जय मल्हार मित्र मंडळाचे अध्यक्ष रतन बन्ने, माजी अध्यक्ष विजय घोडके, उपाध्यक्ष धोंडिबा बनसोडे, सचिव संजय घोडके, कोषाध्यक्ष धनंराज चेंडके, श्रीकांत बन्ने, अनिल जवान, रुकाप्पा बन्ने, लक्ष्मण बन्ने, बरगली चेंडके, राजकुमार दूधभाते, राहुल बन्ने, गुरु घोडके, मारोती बन्ने, चंद्रकांत सोनटक्के आदींच्या उपस्थित अभिवादन करण्यात आले.  जयंतीचे औचित्य साधून परिसरातील गोरगरीब जनतेला अन्नदान करण्यात आले. यावेळी नगरसेविका ज्योती बन्ने, माजी नगरसेविका वंदना बन्ने, विजयाबाई चेंडके, निर्मला दूधभाते, सुनिता घोडके, अंबुबाई बन्ने, श्रद्धा घोडके, चंम्माबाई बन्ने, मंगल सोनटक्के आदींनी पुढाकार घेऊन अन्नदान केला.


 
Top