लोहारा/प्रतिनिधी

कोविड महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शिक्षक विकास घोडके यांच्या पुढाकारातून शिवसेनेच्या सहकार्याने कै.नागनाथ घोडके गुरूजी यांच्या स्मरणार्थअहिल्यादेवी होळकर जयंतीचे औचित्य साधुन लोहारा शहरातील प्रभाग क्रं. 9 मधील पांढरे प्लाॅट व शेटगार प्लाॅटमध्ये घरोघरी जाऊन जंतुनाशक फवारणी करण्यात आली. 

आ.ज्ञानराज चौगुले व शिवसेना यूवा नेते किरण गायकवाड यांनी लोहारा शहर फवारणीसाठी शिवसेनेच्या माध्यमातुन जंतुनाशक फवारणीचे औषध कर्तव्य म्हणुन उपलब्ध करुण दिले. त्यामुळे लोहारावासियातुन समाधान व्यक्त केले जात आहे. यावेळी युवासेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, शहरप्रमुख सलीम शेख, तंटामुक्ती अध्यक्ष अमीन सुंबेकर, विकास घोडके सर, हेमंत माळवदकर, संगमेश्वर मिटकरी, मल्लिनाथ बिराजदार, विजय वेदपाठक, राम पांढरे,  राम माळी, रमाकांत घाटे, अनुसया भुजबळ, हसंजय माशाळकर, सिध्देश्वर जट्टे, गुलाब साळुंके, दत्ता माळवदकर, हेमंत माळवदकर, ओंकार चौगुले, प्रशांत थोरात, धनराज फरीदाबाकर, मदार सय्यद, उद्धव सोमवंशी सर, राजोळे सर, अल्लाबक्ष सौदागर, सलमान सय्यद, उमेश जवादे, बिलाल बागवान, अंकुश बंडगर, राजू बंडगर, शेखर चौगुले, झिंगाडे, यांच्यासह प्रभागातील नागरिक उपस्थित होते.


 
Top