उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

राज्यातील महा विकास बिघाडी सरकारने ओबीसी आरक्षण संदर्भात निष्क्रिय भूमिका घेतल्याने ओबीसी आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने गदा आणली असल्याने याच्या निषेधार्थ उस्मानाबाद जिल्हा ओबीसी मोर्चा च्या वतीने  दिनांक 3 जून 2021 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला. त्यानंतर  भाजपा ओबीसी मोर्चा चे जिल्हाध्यक्ष विजय शिंगाडे यांनी विविध मांगण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. 

 राज्यातील महा विकास बिघाडी सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये आयोग न नेमता बाजूच मांडली नसल्याने बहुसंख्येने असणाऱ्या ओबीसी वर्गावर मोठा अन्याय झाला आहे. याला वाचा फोडण्यासाठी दिनांक 3 जून 2021 रोजी सकाळी 10 वाजता भाजपा ओबीसी मोर्चा च्या वतीने उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून आक्रोश आंदोलन करण्यात आले.  

  दिनांक 3 जून 2021 रोजी सकाळी 10 वाजता शिवाजी महाराज चौक, उस्मानाबाद येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश आंदोलन करण्यात आले.  आमच्या ओबीसी समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असा इशारच देण्यात आला. 

िल्हाधिकारी निवेदन देते समयी  ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष देविदास  काळे, भाजप जिलाध्यक्ष  नितीन काले,भाजपा बुद्धिजीवी  प्रकोष्ठ दत्ता  कुलकर्णी,  ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष विजय शिंगाडे, प्रदेश सचिव पिराजी मंजुळे, प्रदेश कार्यकारणी सदस्य ऍड. खंडेराव  चौरे, जिल्हा सरचिटणीस प्रमोद बचाटे, लक्ष्मण माने, परशुराम देशमाने, सतीश वैद्य, फिरोज मुजावर पांडुरंग  लाटे, साहेबराव घुगे ,आदेश कोळी,  सावता माळी, दगडू  तिगाडे,  संतोष क्षीरसागर राम लवटे, प्रमोद पोतदार,  गुलचंद व्यवहारे, तसेच ओबीसी मोर्चा चे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top