तुळजापूर/ प्रतिनिधी-

येथील  श्री शिवाई पुरुष व महिला दिव्यांग बचत गटाच्या  प्रथम वर्धापन दिनानिमित्त बुधवार दि.९रोजी बचत गटाच्या संपर्क कार्यालय चे उद्घाटन  युवा नेते  विनोद पिंटू भैय्या गंगणे यांच्या हस्ते करण्यात आले.

 या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे माजी नगराध्यक्ष श्री चंद्रकांत कने हे उपस्थित होते. कार्यक्रमास बचत गट अध्यक्ष श्री नागेश कुलकर्णी, उपाध्यक्ष हिना खान, सचिव श्री शशिकांत मुळे तसेच बचत गटातील  सदस्य गजेंद्र व्यवहारे, कमलाकर डिग्गे,  प्रकाश देशपांडे, ज्ञानेश्वर मडके, संतराम जाधव, संतोष पवार,शारदा जाधव ,अलका इटकर, सुलोचना सुरवसे ,ज्योती सोनवणे , लक्ष्मी लकशेट्टी आदी सदस्य उपस्थित होते. प्रमुख पाहुणे युवानेते   विनोद   भैय्या गंगणे यांनी मार्गदर्शन केले आणि बचत गटास सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले.


 
Top