कळंब / प्रतिनिधी-

संपूर्ण देशात व महाराष्ट्रात कोरोना माहामारी परमसिमेवर पोहोचली असून गेल्या काही दिवसांपासून कोरोना चा पॉझिटिव्हिटी रेट चा चडता आलेख खाली येत असलेला दिसुन येत आहे. हे खुप चांगले लक्षण आहे.

मात्र कोरोना उपचारांच्या दरा संदर्भात  शासनाने जे नवे दरपत्रक काढले आहे ते डॉक्टर्स /हॉस्पिटल वर अन्याय करणारे आहे. लवकरात लवकर त्यामधे सुधारणा करून नवीन दरपत्रक आमलात आणले जावे अशी आय एम ए ची मागणी आहे.

या मध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांसाठी भिन्न दर निश्चित करण्यात आले आहेत. परंतु कोरोना ची उपचार पद्धती सर्वत्र एकसमान आहे. जसे की औषधांच्या किमती, पेशंट ला द्यायची औषधे. आॅक्शिजन ची मात्रा. कोणती इंजेक्शन द्यायला हवीत व त्याचे प्रमाण. बेड चार्ज, जेवनाचा खर्च ई. प्रोटोकॉल सर्वत्र एकच आहे. मात्र दर निश्चिती मध्ये 40 ते 80 % तफावत दिसून येत आहे. हे अन्यायकारक असून तज्ञांमार्फत सुधारित दर पत्रक तयार करावे व त्यामध्ये आय एम ए च्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात यावा. हल्लीच्या दराने कोविड हॉस्पिटल चालविणे अशक्य आहे व नाइलाजास्तव बंद करावी लागणार आहेत याची शासनाने नोंद घ्यावी असे आय एम ए च्या प्रशिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

यावर प्रदेशाध्यक्ष डॉ रामकृष्ण लोंढे, कळंब शहराध्यक्ष डॉ कमलाकर गायकवाड, सचिव डॉ सत्यप्रेम वारे यांच्या सह्या आहेत. 

 
Top