लोहारा/प्रतिनिधी

लोहारा तालुक्यातील आष्टा कासार येथे दि.14 जुन 2021 रोजी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत गांडूळखत युनिटचे भूमिपूजन सरपंच सौ.सुलभा दशरथ कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. 

रासायनिक खताच्या भरमसाठ वापरामुळे जमिनीचा कर्ब दिवसेंदिवस कमी होत आहे. म्हणून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त शेणखताचा व गांडूळ खताचा वापर करून आपल्या जमिनीचे आरोग्य कशा पद्धतीने सुद्रुढ करता येईल, असे कृषी पर्यवेक्षक रवी बनजगुळे यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त गांडूळखताचा वापर करावा व आपल्या जमिनीचा पत वाढवण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन आष्टा कासार चे कृषी सहाय्यक सचिन पवार यांनी केले. यावेळी कृषी पर्यवेक्षक रवी बनजगुळे, आष्टा कासार चे कृषी सहाय्यक सचिन पवार,  उपसरपंच वसंतराव सुलतानपूरे, कृषी सहायक स्वामी चिदानंद, शिवशंकर कांबळे प्रभाग संघ जेवळी, मुकेश मूळे, सिद्राम तडकले, गुंडेराव शिंदे, विवेक सोमवंशी, राजेंद्र शिंदे, राहुल कोरे, यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.


 
Top