लोहारा/प्रतिनिधी

रक्तदाब, मधुमेह, अर्धांगवायूचा झटक्याने अपंगत्व आलेले असतानाही योग्य उपचार व सकारात्मक इच्छाशक्तीच्या बळावर लोहारा तालुक्यातील जेवळी येथील 78 वर्षीय निवृत्त मुख्याध्यापकांने कोरोनाला हरविले आहे. यावेळी याच कुटुंबातील एकूण आठ सदस्यांनाही कोरोना विषाणूचा बाधा झाला होता. कुटुंबातील काही सदस्य वयोवृद्ध व इतर व्याधीने त्रस्त असूूनही एकत्रित धैर्याने कोरोना साथरोगावर मात केली असून याबाबत परिसरात कौतुक होत आहे. 

आरोग्य विभागाकडून योग्य उपचार बरोबरच बाधित आठ सदस्या पैकी पाच सदस्य कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यानेे चांंगला फायदा झाला असून यामुळे प्रकृती फारशी गुंतागुंत निर्माण झाली नाही. जेवळी येथील निवृत्त मुख्याध्यापक विश्वनाथ कोरे यांचे संयुक्त कुटुंब आहे. एक भाऊ नोकरीनिमित्त लातूर येथे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला असून विश्वनाथ कोरे हे आपली मुलं व दुसऱ्या भावांची मुलं, सुना नातवंडासह जेवळी येथे संयुक्त कुटुंबात राहतात. कुटुंबात एकुण 19 सदस्य आहेत. कुटुंब प्रमुखाची जबाबदारी विश्वनाथ कोरे यांच्याकडेच असून ते अठरा वर्षांपूर्वी जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक ( प्राचार्य) पदावरून निवृत्त झाले आहेत. रक्तदाब, मधुमेहामुळे त्यांना निवृत्तीनंतर त्यांना आठदिवसातच अर्धांगवायूचा झटका आला यात उपचारांनंतर शरीराची एक बाजू अपंग राहिली आहे. कुटुंबाने त्यांची चांगली सुश्रूषा ठेवल्याने आध्यापही त्यांची प्रकृती उत्तम आहे. कोरोना काळात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मोठी काळजी घेतली परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शेवटी विषाणूंचा प्रादुर्भाव झाला. दि.15 मे रोजी त्यांना ताप आला येथील डॉ संतोष ढोबळे यांच्या उपचारानंतर ताप कमी झाला. परंतु थकवा जाणवू लागला डॉ ढोबळे यांचा सुचनेनुसार कोरोना तपासणी केले असता 22 मे ला अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यांना त्वरित लोहारा येथील ग्रामीण रुग्णालयातील कोविंड सेंटरमध्ये ऑक्सिजन बेड उपलब्ध असल्याने तेथे त्यांना भरती करण्यात आले. पाठोपाठ 24 मे ला भावाचा मुलगा शिक्षक शशिकांत (वय 44) यांना लक्षणानंतर स्वॅब तपासले असता तेही पॉझिटिव्ह आले. यामुळे घरातील सर्वांचे 26 मे ला आरटीपीसीआर तपासणीकेली असता 19 पैकी भाऊ सुभाष (वय 75), हृदय संबंधित शास्त्रकिया (एन्जोप्लास्टी) झालेले व मधुमेह ग्रस्त असलेले भावजय निलाबाई (वय 72), नातू सुमित (वय 26), सुरज (वय 18), मयुरी (वय 16) व वडिलांच्या व्यवस्थेसाठी सोबत राहिल्याने मुलगा ॲड सुनिल कोरे (वय 52) असे एकूण आठ सदस्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव आला परंतु सुदैवाने एक - दोघे सोडले तर सर्वांना फारशी लक्षणे नव्हते यांना लोहारा येथील कोविंड केअर सेंटर मध्ये ठेवण्यात आले. कुटुंबातील अनेक सदस्य बाधित झाले होते परंतु या संकट काळी सर्वांनी न घाबरता, धैर्याने, सकारात्मक विचाराने एकमेकांना धीर दिल्याने करोना सात रोगावर मात केली आहे. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक कटारे, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.गोविंद साठेे, डॉ. संतोष ढोबळे, डॉ.बाबासाहेब भूजबळ, डॉ.मुकूंद माकणे आदींची योग्य उपचार केला.


 
Top