तुळजापूर / प्रतिनिधी-

 तिर्थक्षेञ तुळजापूरात छञपतीशिवाजीमहाराज पुतळा परिसर कामाचे मार्कींग रविवार दि१३रोजी करण्यात आले.सदरील प्रसंगी नगराध्यक्ष सचिन रोचकरी नगरसेवक विशाल रोचकरी नगरसेवक विजय कंदले नगरपरिषद अभियंता प्रशांत चव्हाण सह शिवभक्त उपस्थितीत होते.

येथील शिवाजी चौकात छञपतीशिवाजीमहाराज पुतळा बसवणे व परिसर सुशोभिकरण कामाचे डिझाईन आर्कीटेक्ट प्रदीप  देशपांडे यांच्या कडुन नगरपरिषदस प्राप्त होताच रविवारी मार्कींग करण्यात आली असुन सदरील सुशोभिकरण खोदकामास सोमवारी आरंभ होणार आहे. सदरील सुशोभिकरण कामासाठी ८० लाख  खर्च रुपये  येणार आहे. छञपती शिवाजी महाराज पुतळा दुरुस्तीसाठी १२ लाख खर्च आला आहे. ८०  लाखात ५६ लाख रुपये स्थापत्य कामासाठी खर्च होणार असुन  २४ लाख रुपये उर्वरीत सुशोभीकरण कामासाठी खर्च होणार आहे. सदरील काम सहा महिन्यात पुर्ण करण्याचा मानस आहे.सुशोभिकरण काम सुरु झाल्याने शिवभक्तांनमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 
Top