उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 तालुक्यातील बेंबळी येथील तरुण व्यवसायिक तथा पत्रकार सचिन लक्ष्मणराव व्हनसनाळे ( वय 37) यांचे शनिवारी ( दि. 11)  हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.  बार्शी ( जि. सोलापूर) येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. व्हनसनाळे यांनी विविध दैनिकांमध्ये काम केलेले होते. ग्रामसेवा ग्रुपच्या माध्यमातून बेंबळी गावात विविध सामाजिक उपक्रमात ते सतत सक्रिय होते.   त्यांच्या पार्थिवावर बेंबळी ( ता. उस्मानाबाद) येथे शनिवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे.

 
Top