उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद येथील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ शैलेश पालकर यांचे सोलापुर येथे उपचार दरम्यान दुःखद निधन झाले आहे. रविवारी पहाटे साडे तीनच्या सुमारास उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मावळली, त्यांच्यावर आज उस्मानाबाद येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

 डॉ पालकर हे अनेक गरजू व गोरगरीब लोकांचे उपचार रुग्णसेवा या नात्याने मोफत करीत असत. त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी डॉ शरयु , मुलगा आरव असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे


 
Top